Monday, December 20, 2010

मातीतून शिवाजी

ह्या राष्ट्राची माती पवित्र आहे! ह्याच मातीतून शिवाजी, संभाजी जन्माला आले!
ह्याच मातीत स्वराज्याचे बीज परले गेले! इथेच ते फळाला आले! इथेच अनेक अनामी
वीर स्वराज्यासाठी लढले आणी कैक धारातीर्थी पडले! इथली माती त्यामुळेच लाल असेल
का?
जेव्हा मुजोर औरंग्या ३ लाख सैन्य घेउन टीचभर स्वराज्यावर चाल करून आला तेव्हा
संभाजी नावाच्या एका 'पोराने' पहिली नऊ वर्षे आणी नंतर इथल्याच संताजी-धनाजी
ह्यानी मोगली बकासुरास इथेच गाडले! पुढल्या काही वर्षातच त्याच मोगलांच्या
दिल्लिचं तख्त काबिज़ करून ह्या महाराष्ट्राचा भगवा अगदी अटकेपार फडकला! ही
ताकत आहे इथल्या मंनगटातली!
जितका रंजक इथला इतिहास तितकाच इथला निसर्ग वैविध्यपूर्ण!
इथला कोंकण किनारा,इथला समुद्र, इथले सह्याद्री पर्वत, इथली घनदाट अरण्ये...
इथली वन्यजीवसृष्टी देखील विविधतेने नटलेली आहे! इथली फळ ही जगप्रसिद्ध आहेत!
सर्व दुनियेला वेड लावणारा फळांचा राजा हापूस आंबा देखील

No comments:

Post a Comment